image

People who stand out from the soil are aware of that soil. I wanted to make a big banyan tree out of small thoughts. And the same ambition I have put before you through Morgan Milk and Dairy Ind Pvt Ltd. ....! In order to make the dream of all-round development of India a reality, the Mahatma Gandhi’s raised the issue of village development before the people.

Those took a bold decision to transform his rural area by embracing that message and decided to start a dairy business with a focus on balanced and prosperous development of rural areas.

While strengthening the family economy, farmers should not only depend on agriculture, for which they should also focus on agricultural supplements. This thought came to my mind.

Although agriculture is an important source of production, other sources should be developed accordingly. Milk production is a close supplementary business in which one can earn a couple of paise. So I was attracted to the dairy business Established

Concerned with the joys and sorrows of Baliraja, he started the dairy business as his own pain. This milk team is getting good response from the milk producing farmers.

India is the world's leading producer of milk and dairy products. Dairy industry faces many challenges today. But it is certain that the industry will continue to grow in the future

Morgan Milk and Dairy Pvt. Ltd. was established in 2018 with a capacity of 4 lakh liters per day at the urging of dairy farmers. Hundreds of youths, milk producing farmers have been provided employment. Not only in the taluka but also in Nashik district, the eagle has jumped all over the state. Pvt. Ltd. was started by Morgan Group in 1988. Sai Girna was started in 2013 with the intention of paying off the debts of the society in which we were born.मातीतून उभे राहणाऱ्या व्यक्तींना त्या मातीची जाणीव असते.छोट्या विचारांचे मोठे वटवृक्ष करण्याची इच्छा मनात होती.आणि तीच महत्वकांक्षा मी मोरगन मिल्क अंड डेअरी इंड.प्रा.ली.च्या माध्यमातून आपल्या समोर ठेवली आहे माझ्या शून्यातून उभारलेल्या स्वप्नपूर्तीच्या ध्येयाला आपण संधी दिली त्याबद्दल प्रथमतः आपले आभार....!

भारताच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न साकार व्हावं म्हणून ग्रामोद्धार हा विषय महात्म्यांनी जनतेसमोर ठेवला.भारताचा आत्मा खेड्यात राहतो हे ओळखून त्यांनी खेड्याकडे चला असा संदेश सबंध देश बांधवांना दिला होता.तो संदेश अंगीकारून आपल्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि ग्रामीण भागाचा समतोल आणि समृद्ध विकास व्हावा हाच ध्यास मनी बाळगून दुग्धव्यवसाय करण्याचे निश्चित केले.कुटुंबाचे अर्थकारण बळकट करतांना शेतकऱ्यांना केवळ शेतीवरच अवलंबून राहून चालणार नाही,त्यासाठी त्यासाठी त्यांनी शेतीपूरक बाबींवरहि लक्ष केंद्रित करायला हवे.हा विचार माझ्या मनात आला.शेती हा उत्पादनाचा महत्वाचा स्रोत असला तरी त्या अनुषंगाने इतरही स्रोत विकसित केले पाहिजेत.त्या मध्ये दुग्धोत्पादन हा जवळचा पूरक व्यवसाय आहे त्यातून दोन पैसेही मिळू शकतात.म्हणून मी दुघ्ध व्यवसायाकडे आकर्षित झालो आणि आघार बु.ता.मालेगाव जि.नाशिक येथे साई गिरणा दुध संघाची स्थापना केली.बळीराजाच्या सुख दुखाशी समरस होऊन त्यांच्या वेदना स्वतःच्या मानून दुग्धव्यवसायाला प्रारंभ केला.या दुध संघाला दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

भारत हा दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात जागत प्रथम स्थानावर आहे,दुग्ध उद्योजकांपुढे आज अनेक अडचणी आहेत.परंतु भविष्यात हा उद्योग चिरतरुण राहणार आहे हे निश्चित,मोर्गन समूहाची सुरुवात 1988 पासून झाली,आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे देणे लागतो त्याची अल्पशी फेड व्हावी य हेतूने २०१३ पासून साई गिर्नाची सुरुवात झाली.अवघ्या ११७ ली दुधापासून सुरुवात करून आज 1 लाख ५० हजार ली दुधाचा प्रवास सुरु आहे य संघाचा वाढता पसारा पाहून दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव प्रतिदिन ४ लाख लिटर क्षमतेचा मोरगन मिल्क अंड डेअरी इंड.प्रा.ली.ची स्थापना २०१८ मध्ये केली.आणि शेकडो युवकांना,दुध उत्पादक शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इवलेसे रोप लाविले दारी,त्याचा वेलू गेला गगनावरी या प्राम्ने आज दुग्धव्यवसायात मोरगन मिल्क अंड डेअरी इंड.प्रा.ली.ने तालुक्यातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात गरुड झेप घेतली आहे.आपल्या सर्वांच्या सहकार्याने तो देशाच्या शिखरावर जाऊन पोचेल असा मला पूर्ण विश्वास आहे....धन्यवाद  • C.M.D Honble. Samadhan (Dada) Hire

  • Founder & Chairman – Morgan Group